
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शरद भालेराव यांचा सतत 25 तास सावली भिमाची हा एकपात्री नाट्यप्रयोग
जळगाव प्रतिनिधी : सावली भिमाची हा एक पात्री नाट्यप्रयोग आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे शरद भालेराव हे सलग 25 तास सावली भिमाची हा एक पात्री नाट्यप्रयोग भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून सादर करणार आहेत, याची नोंद लिंका बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये होणार आहे,
हा नाट्यप्रयोग नूतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी नऊ वाजेपासून सादर होणार आहे. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी जळगावकर नागरिक. नाट्यप्रेमी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.