खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : – शहरात जोशींपेठ परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

घरात कोणीही नसतांना शामसुंदर ओमकार पाटील (वय ५२, रा. जोशी पेठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे .
शहरातील जोशी पेठ परिसरात शामसुंदर पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. ते औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते. रविवार दि. २८ जानेवारी रोजी घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे कुटुंबीय घरी आले त्या वेळी पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button