जळगावात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे १०० कडुलिंबाच्या रोपांचे वृक्षारोपण

जळगावात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे १०० कडुलिंबाच्या रोपांचे वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; लावलेल्या रोपांच्या संगोपनाचीही घेतली जबाबदारी

जळगाव, प्रतिनिधी : वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, जागतिक तापमानवाढीचे संकट अधिक गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे जळगाव शहरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत १०० कडुलिंबाच्या रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही फाउंडेशनच्या वतीने स्वीकारण्यात आली.
या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या हस्ते करण्यात आला. केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी लावलेली रोपे जगविणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, असलम बाबा अशरफी, शेख अबुल जुम्मन, शेख शफी, अॅड. इमरान साहिल, इकबाल वझीर, रऊफ खान, शेख अब्दुल गफ्फार, अजमल शाह, वसीम मणियार, अयाज शाह, सय्यद उमर, नूर खान, झिशान हुसैन, शेख नझिरुद्दीन, गुलाम मुस्तफा, आदिल मेहबूब आणि मुनिरुल इस्लाम यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.
फोटो ओळ : सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे आयोजित वृक्षारोपण मोहिमेत रोपांची लागवड करताना मान्यवर.




