इतर
गांजा ओढणाऱ्या दोघांवर एलसीबीची धडक कारवाई

गांजा ओढणाऱ्या दोघांवर एलसीबीची धडक कारवाई
जळगाव | शहरातील सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करत दोन जणांना अटक केली. ही कारवाई २७ मे रोजी पिंप्राळा उड्डाणपुलाजवळ करण्यात आली.
एलसीबीच्या पथकाने प्रथम शेख समीर शेख मजहर (वय २५, रा. शाहूनगर) याला गांजा ओढताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच परिसरात फैजल खान हसन खान (वय २२, रा. कानळदा रोड) याच्यावरही कारवाई करण्यात आली. दोघांकडून गांजासह मांजा व भोदण्या साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.