जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या ; जळगावात शीतल राजपूत येणार
जळगाव : जळगाव तालुका तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक तहसीलदारांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार पंकज लोखंडे यांची नंदुरबार येथे बदली झाली असून अप्पर चिटणीस उषाराणी देवगुने यांची नाशिक येथे बदली झाली आहे.
संगायो तहसीलदार जितेंद्र कुवर यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे. न.पा. क्षेत्र जळगाव संभाजी पाटील यांची अक्राणी येथे बदली झाली आहे.
लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार विनोद भामरे यांची कल्याण येथे बदली झाली आहे. तर, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांची राहूरी येथे बदली झाली आहे. भडगाव येथील तहसीलदार मुकेश हिवाळे यांची मालेगाव येथे बदली झाली आहे. तसेच शितल राजपूत यांची जळगाव तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तहसीलदार सुर्यकांत येवले यांची पुणे येथे बदली झाली आहे. तसेच ज्योती गुंजाळ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागाच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे. बदल्याचे आदेश उपसचिव अजित देशमुख यांनी काढले आहेत.