खान्देशजळगांवसामाजिक

शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याने निर्माण केले चैतन्य

जळगाव ;- शुक्रवारी संध्याकाळी महासंस्कृतीच्या मंचावर खानदेशातील जुनी परंपरा असलेली वही गायन ही कला, खानदेशात ग्रामीण भागातील गाठोड्या ही लोककला आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा असे चैतन्य पेरणारे कार्यक्रम सादर झाले.

खानदेशातील ग्रामीण भागात काही विशिष्ट गावांमध्ये गणेशोत्सव, नवरात्री अथवा काही ठिकाणी स्थानिक यात्रोत्सवात कधीकाळी हमखास दिसणारे आणि सध्या दुर्मीळ होत चाललेली कला म्हणजे वहीगायन…. ओवी’ या शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन ‘वही’ हा शब्द या लोककला प्रकारात रुढ झाला, ते सादर केले योगराज सोनवणे या लोककलाकाराने…

शाहिर परशुराम सुर्यवंशी यांनी तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे लोकदेव खंडोबा यांच्यावरील लोकसंस्कृतीमधले जागरण- गोंधळ, जात्यावरच्या ओव्या, गाऊन विविध भागातली लोकगीतं गाऊन दाखविली.

रघुनाथ बाविस्कर आणि ग्रुप आणि तसेच शाहिर परशुराम सूर्यवंशी यांनीही लोककला सादर केल्या. शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर वीर रसातला पहाडी आवाजातला पोवाडा सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.
शासकीय नोकरीत राहून आपला छंद जोपासणाऱ्या वर्षा वाघमारे यांनी ‘लावणी’वर अत्यंत देखणे नृत्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button