जळगाव ;- जिल्ह्यात रविवारी राबविण्यात आलेल्या नाकाबंदीत संशयितरित्या फिरणाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्याकडून 13 पिस्तूल जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱयांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी म्हणाले कि, की, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळे रोडवर नाकाबंदी करण्यात आली होती. पुणे येथील मोटारसायकल संशयितरित्या फिरत असतांना पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळून जाण्याच्या तयारी असतांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडील बॅगेत चार पिस्तूल, दहा काडतुस, मोटारसायकल असा 1 लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात आमीर आसिफ खास (कोढवा, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर पुणे पोलिसांत मोक्का, 302, 307 चे गुन्हे दाखल आहेत. तो सहा महिन्यांपासून फरार होता. त्याचा साथीदार आदित्य भोई कुल्लू (पुणे) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दुसर्या घटनेत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. गोपीनीय महितीच्या आधारे पोलिसांनी विष्णापूर-उमर्टी रस्त्यावर सापळा लावला होता. यात चार संशयित हे पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळील बॅगेत 9 गावठी कट्टे, 20 जीवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. यात आरोपी हरदीपसिंग प्रकाशसिंग बावर, मनवतसिंग वनवाल (उमर्टी), अरबाज पिंजारी (हरिविठ्ठल नगर, जळगाव), अर्जुन मालीक (पंजाब) यांना अटक करण्यात आली आहे. यात चार लाख 7 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अरबाज पिंजारी याच्यावर सहा गुन्हे दाखल असून त्याची अन्य आरोपींशी जेलमध्ये ओळख झाली होती. या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची या आठवड्यात शक्यता असल्याने आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस दलातर्फे मोहीम राबविण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.