जळगाव ;- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात तसेच आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे व खासदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात भाजपा युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा संवाद’ कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहरात नुतन मराठा कॅालेज तसेच जुने जळगाव, अयोध्या नगर, हनुमान मंदिर परिसर पिंप्राळा, हरी विठ्ठल नगर, शिवाजी नगर, दादावाडी परिसर, लक्ष्मी नगर, मेहरूण, महाबळ परिसर, रिंग रोड परिसर, बळीराम पेठ या भागात युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामाध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा तसेच केंद्रातील विविध योजनांची माहिती युवा वर्गाला देण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी आपल्या मनोगत “आजचे युवा हेच या देशाचे भविष्य असणार आहेत आणि सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात त्यांचे खूप मोठे योगदान असणार आहे,” असे सांगितले. याशिवाय युवा मोर्चाचे सरचिटणीस विकास सोनार यांनी सर्व योजनांची माहिती संक्षिप्तपणे युवा वर्गाला दिली. आठ दिवसात हा कार्यक्रम पूर्ण जळगाव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. शहरातील प्रत्येक भागामध्ये जाऊन युवा वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना त्यात मुद्रा लोन विषयी, खेलो इंडिया बद्दल, व केलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली. युवा संवादामध्ये युवा वर्गाकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि सर्व युवकांनी नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांची प्रशंसा केली.
भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमाला युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर जाधव, जितेंद्र चौथे, गजानन वंजारी, मयुर कापसे, उपाध्यक्ष योगेश बागडे, गौरव ढेकळे, रोहित सोनवणे, अश्विन सैंदाणे, शाम पाटील, सुनील भारंबे, रियाज शेख, चिटणीस स्वप्निल भांडारकर, अबोली पाटील, निलेश बाविस्कर, उन्मेश चौधरी, कल्पेश भोईटे, मयुर भदाणे, आर्यन शेठ, मयुर ठाकरे, संकेत शिंदे, व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.