खान्देशजळगांवराजकीय

माजी आमदार मनीष जैन रावेर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक !

रावेर;- माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय पत्रकारांशी संवाद साधताना केला असून अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे संकेत मनीष जाईन यांनी दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्त ते ना. अनिल पाटील यांच्या सोबत रावेर तालुक्यात आले होते.

रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास नक्की पूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरणार असल्याचे माजी आमदार जैन यांनी येथे सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्त ते मंत्री अनिल पाटील यांच्या सोबत रावेर तालुक्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली.
यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे, नंदू महाजन आदींची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. काँग्रेसच्या वतीने शिरीष चौधरी अथवा त्यांचे पुत्र धनंजय चौधरी निवडणुकीच्या रींगणात उतरतील, अशी शक्यता आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून रींगणात उतरणार आहेत तर आता मनीष जैन यांनी देखील इच्छा व्यक्त केल्याने येथील लढत ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button