जळगाव ;- कारागिराला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्कीट आणि लगड असे २५६ ग्राम वजनाचे असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल सोने कारागिराने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफा व्यापारी शुभम प्रदीप वर्मा वय ३० रा. लक्ष्मी नगर, जळगाव आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा रा. जळगाव यांनी शेख अमीरूल हुसेन वय २८, रा. मंडूलीका बाजार, ता. जगत वल्लभपूर जि. हुगली राज्य पंश्चिम बंगाल ह.मु. जोशी पेठ यांला १५ लाख रूपये किंमतीची २५४ ग्रॅम सोन्याची लगड आणि २ लाख रूपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकुण १७ लाखांचे सोने दानिगे बनविण्यासाठी बुधवार २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दिले. मात्र कारागिर शेख अमीरूल हुसेन हा १७ लाखांचे सोने घेवून पसार झाल्याचे गुरूवार २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. याबाबत व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिल्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता बंगाली सोने कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.