धार्मिकसामाजिक

ईद ए मिलाद १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबरला साजरा होणार !

खान्देश टाइम्स न्यूज l १० सप्टेंबर २०२४ l मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा पवित्र व महत्वपूर्ण सण जो संपूर्ण जगात अत्यंत आनंदात, उत्साह साजरा केला जातो असा जशने ईद ए मिलाद  यंदा दि.१६ सप्टेंबर सोमवार रोजी आहे. या दिवशी सर्व मुस्लिम बांधव जगाभरात अत्यंत भक्तिभावाने उत्साहात जल्लोषात व आनंदात भव्य असा जुलूस काढून हा सण साजरा करतात.

परंतु यंदा गणेश उत्सव व ईद मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे ईद मिलाद च्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक असून या दोन्ही धर्मीय तसेच प्रशासनाची फार मोठी गैरसोय होणार आहे म्हणून जळगावातील सुन्नी मुस्लिम बांधवांची एक बैठक सुन्नी मुस्लिम बांधवांचे मरकज सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा येथे घेण्यात येऊन त्यात जळगावातील सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी त्यात एकमताने हिंदू मुस्लिम बांधव तसेच प्रशासनाला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला कोणतीही बाधा पोहचू नये, दोन्ही धर्मियांत अशाच प्रकारे एकोपा व एकता राहावी यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन पाऊल पुढे घेत मागच्या वेळेस प्रमाणे यंदाही हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवत आपला ईद मिलाद चा जुलूस दि. १६ सप्टेंबर सोमवार एवजी दि. १८ सप्टेंबर बुधवारी काढण्याचे सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व जुलुसे ईद मिलाद ऊन नबी कमिटी जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी याबाबतीत सभेत ठराव मांडला त्यात उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ईद साजरी करण्याबाबतचे पत्र आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व प्रशासनाला देण्यात आले.

या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली , हाजी इकबाल वजीर, सय्यद जावेद, शाकीर चीतलवाला, आसिफ शाह बापू , काशीद अब्दुल सलाम, रईस चांद, शेख झरीफ, जावेद गौस मोहम्मद, मुस्ताकिम शेख, नूर मोहम्मद शेख, शफी ठेकेदार, तौसिफ़ शाह इत्यादी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button