एमआयडीसी पोलीसांची कामगिरी; परराज्यातून संशयितांना पोलीसांनी घेतले ताब्यात
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l २१ ऑक्टोबर २०२४ l खड़ी बनविण्याचे मशीन व मिटर चोरी करणारा संशयित आरोपी यास भोपाळ येथुन एमआयडीसी पोलीस स्टेशनने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कोठडी मिळाली आहे.
एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एक पोलीस पथक तयार केले होते. त्यात पो. हे. कॉ रामकृष्ण पाटील, पो. काँ योगेश घुगे, पो. काँ ललीत नारखेडे अशांची नेमणुक करुन तपासासंबंधी भोपाळ येथे रवाना केले होते. दरम्यान पथकाने संशयित आरोपी गोलु बाबुलाल राजपुत (वय २७, रा. उसल्ली खुर्द ता. आरोन जि.गुना राज्य मध्य प्रदेश) यास त्याचे गावापासुन ५० कि.मी लांब रामपुर येथे शिताफीने ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी यास कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसाचा पो. कस्टडी रिमांड मिळाला होता. त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल ४५ हजार रुपयाचे मशीन व ९ हजार रु. कि. चे प्रिन्टर मशीन असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील तपास पो.हे. काँ रामकृष्ण पाटील करीत आहे.