इतर

वेचलेला कापुस साठवला घरात अन नवीन कपाशी लागवडीसाठी शेतकरी शेतात

भडगाव तालुक्यात बागायती कापुस लागवडीस प्रारभ.

माळरान गजबजले. कपाशी बी. टी. बियाण्याचे पाकीटे उपलब्ध. बियाण्याच्या थैलीचे भाव वाढले. लागवडीत घट होणार.

जळगांव l भडगाव l सागर महाजन l प्रचंड तापमान असल्याने तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जुनपुर्वी कपाशी बी. टी. बियाणे विक्रीस बंदी घातली होती. तर शासनाचे आदेशानुसार १ जुन नंतरच बागायती कापुस पिकाची लागवड करावी. असे आवाहन भडगाव तालुका कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आलेले होते. शासनाकडुन कृषी प्रशासनाच्या मागणीनुसार भडगाव तालुक्यासाठी कापुस बी. टी. बियाण्यांचे एकुण सव्वाशे पाकीटे प्राप्त झालेले आहेत. मागील वर्षी कपाशी बी. टी. बियाण्याच्या थैलीचे भाव फक्त ७३० रुपये होते. माञ यावेळी कपाशी बियाण्याच्या थैलीचे भाव वाढलेले आहेत. सध्या कपाशी थैलीचे भाव ८३५ रुपये आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा यावर्षी कपाशी बियाणा थैलीचे भाव थैलीमागे १०५ रुपयांनी वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना कपाशी बियाणे भाव वाढीचा फटकाही सहन करावा लागत आहे.सध्या भडगाव शहरासह तालुक्यात सिंचन विहीलीरला पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्यांनी बागायती कापुस लागवडीला प्रारंभ झाला आहे. कापुस लागवडीपुर्वी शेती मशागतीचे काम करुन रानोमाळ बैलजोडीने सर्या पाडणे. सर्या पाण्याने ओलवणे, ठिबक सिंचनच्या नळया जोडणे, पाईप लाईनचे कामे करणे. आदि कामे माळरानात करतांना शेतकरी नजरेस पडत आहेत.मागील वर्षी भडगाव तालुक्यात सिंचन विहीरींना पाण्याची मुबलकता होती. त्यामुळे बागायती कापुस पिकाची लागवड १५६०० हेक्टर क्षेञावर शेतकर्यांनी केली होती. तर पाऊस वेळेवर पडल्याने जिरायती कापुस लागवड ९४०० हेक्टर क्षेञावर करण्यात आलेली होती. अशी एकुण २५००० हेक्टर क्षेञावर कापुस लागवड झाली होती. यावर्षी भडगाव तालुक्यात कापुस लागवडीसाठी २६००० हेक्टर क्षेञाचे उद्दीस्ट कृषी विभागाला आहे. बागायती कापुस १६००० हेक्टर क्षेञ तर जिरायती कापुस लागवड १०,००० हेक्टर क्षेञावर होण्याची शक्यता आहे. माञ यावर्षी कापसाला कमी भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकर्यांचा कापुस भाव वाढीच्या अपेक्षेने घरातच साठवुन ठेवला आहे. वेचलेला कापुस घरात अन नवीन कपाशी लागवडीसाठी शेतकरी शेतात अशी अवघड परीस्थिती शेतकर्याची यंदा झाली आहे. यामुळे यंदा कपाशी लागवडीत घट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाऊस पडल्यावर व ७५ ते १०० मिली मिटर पाऊस पडल्यावर व जमिनीत पाणी खोलवर मुरल्यावरच शेतकर्यांनी जिरायत कपाशी पिकाची लागवड करावी. असे आव्हान भडगाव तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. सध्या शेतकरी बी. टी. कपाशी बागायती कपाशीची लागवड रानोमाळ करतांना दिसत आहेत. कपाशी बियाणे घेण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर फिरतांना दिसत आहेत. कपाशी लागवडीसाठी बैलजोडीने सर्या पाडणे. ठिबक नळया शेतात पसरविणे. नळया जोडणे. पाईप लाईन करणे. कुठे लागवड केलेल्या कपाशीला पाणी भरणे आदि कामे करतांना शेतकरी, शेतमजुर नजरेस पडत आहेत. शेतीची कामे सुरु झाल्याने शेतामजुरांच्या हाताला काम मिळत आहे. सध्या तापमानामुळे शेतीचे कामे सकाळुनच करतांना शेतकरी, शेतमजुर दिसत आहेत.

कपाशी पिकासाठी ठिबक सिंचनकडे शेतकर्यांचा कल—
कपाशी पिकाची लागवड करतांना बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनचा वापर करीत आहेत. ठिबक सिंचनद्धारा योग्य प्रमाणात कपाशी पिकाला पाणी मिळते. त्यामुळे गवत, तण वाढत नाही. निंदणीचा खर्च वाचतो. त्यात ठिबक सिंचन साठी शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळतो. त्यामुळे ठिबक सिंचन परवडते. त्यामुळे शेतकर्यांचा कल सध्या कपाशी साठी ठिबक सिंचनकडे असल्याचे दिसत आहे.

कृषी विभागामार्फत शेतकर्यांना आव्हान :
कपाशी बि.टी. बियाणे खरेदी करतांना एम आरपी पेक्षा जास्त भावाने बियाणे घेउ नये. जास्त भावाने बियाणे विक्री होतअसल्यास शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तात्काळ तक्रार करावी. तसेच बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घेउनच बियाण्यांची खरेदी करावी. बियाणे खरेदी करतांना परवानाधारक दुकानदाराकडुनच बियाणे खरेदी करावे. खाजगी कोणत्याही व्यक्तीकडुन कपाशी बियाणे खरेदी करु नये.असे आव्हान कृषी विभागामार्फत शेतकर्यांना करण्यात आले आहे. तसेच कपाशीचे स्वदेशी ५ बियाणे उपलब्ध झालेले नसुन हे बियाणे कोणी उपलब्ध करुन दिल्यास खरेदी करु नये. कोणत्याही अमिशाला बळी पडु नये. हे बियाणे बोगस असुन तसे विक्री करतांना कोणी आढळुन आल्यास त्वरीत कृषी विभागाकडे तक्रार करावी. व होणार्या फसवणुकीपासुन सावधान राहावे. असे आव्हानही भडगाव तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी शेतकर्यांना केले आहे.बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भडगाव तालुक्यासाठी भरारी पथके नेमण्यात आलेले आहेत. सध्या कपाशी विक्री सुरु झाली आहे. कृषी केंद्र दुकानांची कृषी विभागामार्फत तपासण्या होतांना दिसत आहेत.

प्रतिक्रीया:
भडगाव तालुक्यासाठी कपाशी लागवडीसाठी यंदा २६००० हेक्टर क्षेञाचे उद्दीष्ट आहे. बागायती कपाशी लागवडीसाठी १६००० हेक्टर तर जिरायती कपाशी लागवडीसाठी १०,००० हेक्टर पर्यत कपाशी पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. बी. टी. कपाशी बियाण्याच्या थैलीची किंमत ८३५ रुपये इतकी आहे. बियाणे खरेदी करतांना बिलाची पक्की पावती दुकानदाराकडुन घ्यावी. बियाणे परवानाधारक दुकानदाराकडुन घ्यावे. बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आलेले आहेत. बोगस बियाणे विक्री होत असल्यास कुणाची फसवणुक झाल्यास तात्काळ कृषी विभागाकडे शेतकर्याँनी तक्रार करावी.
बी. बी. गोरडे. तालुका कृषी अधिकारी. कृषी अधिकारी. भडगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button