जळगावः मेहरूण शिवारातील यशोदा नगरातील शेतातून महावितरण कंपनीच्या मालकीचे १५ हजार रूपये किंमतीचे अल्यूमिनीअमचे तारांची चोरी केल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे.
याप्रकरणी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील मेहरूण शिवारातील यशोदा नगरातील शेतातून महावितरण कंपनीने लावण्यात आलेल्या अल्यूमिनीअमच्या १५
हजार रूपये किंमतीच्या विद्युत तारांची चोरी झाल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकारी निलेश हरीदास कुरसंगे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहे.