जळगाव महानगरपालिकेच्या मालकीची ब्रिटिश कालीन गिरणा पंपिंग पासून असणारी पाईपलाईन चोरी प्रकरणाची दखल मनपाच्या आयुक्तांनी घेतली असून ज्ञानेश्वर ढेरे यांनी सोमवारी घटनास्थळाची पाहणी केली आयुक्तांसह सहाय्यक आयुक्त सुमित जाधव, उप अभियंता योगेश बोरोले, शहर अभियंता मनिष अमृतकर, अभियंता शामकांत भांडारकर, अभियंता दिपक चौधरी उपस्थित होते.
गिरणा पंपींग व दापोरा जलशुध्दीकरण केंद्रापासून गिरणा टाकीपर्यंत इंग्रज काळात विडाच्या धातूची पाईपलाईन टाकाण्यात आली होती. गिराश पंपींगवरून सन २००८
मध्ये पाणी पुरवठा बंद होवून जळगाव शहराला यापुर धरणावरून पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. तेव्हापासून गिरणा पंपींग ते गिरणा टाकीपर्यंतची पाईपलाईन बंद अवस्थेत पडून होती. सदर पाईपालईनकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे सुनिल महाजनांसह काही लोकांनी ती पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने काढून चोरी करण्याचा प्रयत्न केला. वायाया महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला माहिती
मिळताच महापालिकेच्या अधिकान्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु पाईप चोरी करणारे लोक तेथून पळून गेल्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दि.२ रोजी पुन्हा पाईप
चोरी करण्यात येत असल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून जेसीबीसह तीन जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याविरूध्द जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी
रामानंदनगर पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून चौकशी सुरु आहे. या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी दापोरा जलशुध्दीकरण केंद्र, गिरणा पंपोंग स्टेशन व चोरी झालेली पाईपलाईनची पाहणी केली.