जळगाव (प्रतिनिधी );- महावितरण च्या सावदा विभागाच्या सहाय्यक महिला अभियंता आणि लाईनमन तंत्रज्ञ यांनी ज्यांनी वीज मीटर फॉल्टी असल्याचा सकारात्मक अहवाल देण्याच्या नावाखाली 4 हजार रुपयांची लाच मागितल्याची खळबळ जनक घटना आज दुपारी उघडकीस आली असून जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला ठिकाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की
तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असल्याने त्यांच्या हॉटेलमधील मिटर हे फॉल्टी असल्याचे कारण देऊन मीटरचा सकारात्मक अहवाल देण्याच्या मागणीसाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुखदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी या तिघांवर लाच घेताना कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
. ही कारवाई जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिनेश सिंग पाटील नाईक किशोर महाजन राकेश दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.