पहिल्याच वर्षी निकाल १०० टक्के; ३७ डॉक्टर चमकले
जळगाव l २१ जुलै २०२३ l महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवीच्या (एमडी, एम एस) निकालात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा डंका वाजला असून पहिल्याच वर्षी १०० टक्के निकाल लागला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत १०० टक्के निकाल लागणारे एकमेव डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आहे. येथे १३ विभागातून ३७ डॉक्टरांनी घवघवीत यश संपादन केले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयात सन २०२० पासून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रमास सुरवात झाली. या शैक्षणिक वर्षात ३७ विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेत स्वत: सह महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयातील भुलरोग विभाग, कान नाक घसा, मेडिसीन, स्त्रीरोग, नेत्रविकार, अस्थिरोग, पॅथॉलॉजी, बालरोग, मानसोपचार, रेडिओलॉजी, त्वचाविकार, शल्यचिकित्सा आणि श्वसनविकार या विभागासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात यशाची उज्ज्वल पताका फडकविली आहे.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड आदिंनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
असे आहेत यशस्वी डॉक्टर्स :
भुलरोग विभाग – डॉ.शिवाजी दिलीप सोनोने, डॉ.हर्षा संजीव देशपांडे, डॉ.प्राजक्ता प्रकाश शिलाहार, डॉ.विजया विवेक केळगावकर. कान नाक घसा विभाग – डॉ.हर्षल वासुदेव महाजन, डॉ.श्रृती शैलेंद्र खंडागळे. मेडिसीन विभाग – डॉ.कामेली मोहम्मद जुनैद रफीक एहमद, डॉ.तेजस कुंदन कोटेचा, डॉ.आदित्य महादेव नांदेडकर, डॉ.प्रियंका अशोक भालके, डॉ.सुशांत प्रकाश वागज. स्त्रीरोग विभाग – डॉ.आकाशकुमार शालिकराम डोंगरवार, डॉ.महेश गजानन देशमुख, डॉ.यशश्री प्रदिप देशमुख. नेत्ररोग विभाग – डॉ.आकाश उत्तमराव मालवी, डॉ.कल्पना अर्जुनराव देशमुख, डॉ.अनुजा विनायक गाडगीळ. अस्थिरोग विभाग – डॉ.राहूल शांतीलाल जनबंधू, डॉ.परिक्षीत प्रताप पाटील, डॉ.सुनीत नितीन वेलणकर. बालरोग विभाग – डॉ.प्रज्ञिल किशोर रांगणेकर, डॉ.सुरुची रामप्रसाद शुक्ला. पॅथॉलॉजी – डॉ.प्रियंका शशिकांत कांबळे. मानसोपचार विभाग – डॉ.गोविंद उद्धवराव यादव, डॉ.मुजाहिद शेख. रेडिओलॉजी विभाग – डॉ.कनिष्का रवि भारापुरिया, डॉ.अभिजीत ज्ञानेश्वर भोसले, डॉ.शेख मोहम्मद झैनुल. त्वचाविकार – डॉ.प्राजक्ता प्रकाश कलबंडे, डॉ.शेख मोबीना इरफान. शल्यचिकित्सा विभाग – डॉ.अनिश अविनाश जोशी, डॉ.वैभव बाळासाहेब फरके, डॉ.शुभम श्रीकृष्ण मानकर, डॉ.श्रीयश कोडिंबा सोनवणे, डॉ.वरुणदेव अशोक सिरपुरम. श्वसनविकार विभाग – डॉ.सुशिल सुरेश लंगडे, डॉ.समाधान दत्तात्रय बाहेकर.
्र—
रुग्णसेवेसाठी स्पेशालिस्ट ३७ डॉक्टरांची टिम
वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सर्वप्रथम डॉक्टरांचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा. ३७ स्पेशालिस्ट डॉक्टरांची टिम या महाविद्यालयातून आज घवघवीत यश संपादन करुन रुग्णसेवेसाठी बाहेर पडत आहे. हे सर्व डॉक्टर्स देशभरात विविध भागात रुग्णसेवा देणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील टिचिंग स्टाफचे मार्गदर्शन आणि भावी डॉक्टरांची अथक मेहनत या निकालातून दिसत आहे. कोविड काळातही ८ हजार रुग्णांवर या डॉक्टरांनी उत्तम उपचार केले आहे. अॅल्युमिनी मिटच्या माध्यमातून प्रत्येक डॉक्टर एकूण उत्पन्नाच्या १ टक्के भाग संस्थेला देणार असून ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे. हॉवर्ड विद्यापीठाचा पायंडा ह्या गोदावरी संस्थेतही अंमलात आणला जात आहे, हे निश्चितच कौतुक करण्यासारखे आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन
– डॉ.उल्हास पाटील, माजी खासदार,
अध्यक्ष, गोदावरी फाऊंडेशन.