
एरंडोल येथे कंटेनरची कारला धडक ; महिला जागीच ठार
एरंडोल प्रतिनिधी
कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत कारमधील महिला जागी ठार झाली तर अपघातात महिलेचा पती आणि मुले जखमी झाल्याची घटना
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर यूपी ढाब्यासमोर दि. २४ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली .
राजेश पाटील हे आपल्या कारने एरंडोल कडून मुक्ताईनगर कडे जात असताना कंटेनर क्रमांक डब्लयु बी २३ एफ ९४७२ या वाहनाच्या ड्रायव्हर ने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून मारुती स्विफ्ट क्रमांक एम एच १९ सी क्यू ७००९ या कारला धडक दिली. त्यात राजेश पाटील यांच्या पत्नी रूपाली राजेश पाटील ह्या मयत झाल्या. तर राजेश पाटील व त्यांची मुले खुशी , स्वरा , गुरुनाथ हे जखमी झाले.
याबाबत राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. काॅ. काशिनाथ पाटील हे करीत आहे.