जळगांव
पोस्ट कार्यालयांमध्ये तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्
जळगाव l ३ ऑगस्ट २०२३ l जळगाव विभागातील सर्व पोस्ट कार्यालयामध्ये मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही तिरंगा ध्वज विक्रीला उपलब्ध आहे. तिरंगा ध्वज हवे असल्यास आपली मागणी जवळच्या पोस्ट कार्यालयात नोंदवावी. असे आवाहन जळगाव डाक अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मागील वर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी यावर्षी तिरंगा ध्वजाची मागणी वेळेत नोंदवावी. असे आवाहन करण्यात आले आहे.