जळगाव : शेतकऱ्याने घरासमोर उभे केले ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरुन नेल्याची घटना गुरुवारी कुसुंबा गावात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा खुर्द गावात सुर्यसिंग प्रताप पाटील हे शेतकरी वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे (एमएच १९, एपी ७६२७) क्रमांकाचे ट्रॅक्टर तर (एमएच १९, एएन ७८६४) क्रमांकाची ट्रॉली आहे. त्यांनी ते घरासमोरील मोकळ्या जागेत लावलेले होते. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने त्यांचे ट्रॅक्टवर व ट्रॉली चोरुन नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर सुर्यसिंग पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्यातक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपा पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहे.