साजिद अख्तर यांच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल अभिनंदन

साजिद अख्तर यांच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल अभिनंदन
जळगाव : (आसिफ शेख़) सरकारमान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक संघटना ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशन (आयटा) चे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा सचिव शेख साजिद अख्तर अब्दुल रौफ (मिल्लत प्राथमिक शाळा, मेहरूण, जळगाव) यांची आयटा, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे.
या संदर्भात जळगाव शहर शाखेकडून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आयटा जिल्हाध्यक्ष जानसार अख्तर होते. यावेळी शहर सचिव शेख आसिफ हारून, रफिक खान, साजिद रफिक, अशफाक, तबरेज असलम आणि शेख ज़य्यान अहमद उपस्थित होते.
स्वागत समारंभानंतर साजिद रफिक यांनी नवनिर्वाचित साजिद अख्तर यांना एक रोप भेट दिले. जिल्हाध्यक्ष जानसार अख्तर यांनी आशा व्यक्त केली की, या रोपाप्रमाणेच आयटाच्या अनेक शाखा शैक्षणिक मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्यांना सावली देतील.
या प्रसंगी साजिद अख्तर यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि संपूर्ण जिल्ह्यात आयटाच्या नव्या युनिट्स स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सत्कार समारंभात रोपटे भेट देताना साजिद रफिक आणि त्यांच्यासोबत शेख अशफाक, आसिफ हारून, रफिक खान, जानीसार अख्तर, शेख ज़य्यान अहमद आणि तबरेज असलम उपस्थित होते.





