
ओरिजनल पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर; सामाजिक आणि पत्रकारीय प्रश्नांवर सक्रिय चर्चा
मुख्तार शेख सावदा
सावदा ;– , दि. 7 ऑगस्ट 2025: रावेर तालुक्यातील सावदा येथील शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे आज, गुरुवार, 7 ऑगस्ट 2025 रोजी ओरिजनल पत्रकार संघ, सावदाच्या नवीन कार्यकारिणीची एक मताने निवड करण्यात आली यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. तरी या बैठकीत पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर सखोल चर्चा करून संघटनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. विशेष म्हणजे, समाजहितासाठी आणि गरजूंसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णयही घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणीची रचना खालीलप्रमाणे आहे:
अध्यक्ष: भानुदास बारंबे
उपाध्यक्ष: दिलीप चांडेलकर
कार्याध्यक्ष: युसुफ शहा
सचिव: फरीद शेख
खजिनदार: कैलास लवंगडे
प्रसिद्धी प्रमुख: अजहर खान
सहसचिव: मिलिंद कोरे
सदस्य: दीपक सरावगे,
सदस्य: मुख्तार शेख,
सदस्य: लाला कोष्टी,
सदस्य: प्रशांत सरोदे
बैठकीत पत्रकारांच्या हितासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक मुद्द्यांवर विचारमंथन झाले. गरजू विद्यार्थ्यांना आणि समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवले जाणार असून, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरवले. पत्रकारी क्षेत्रातील आव्हाने, स्थानिक समस्यांचे निराकरण आणि पत्रकारांचे हक्क यावरही सविस्तर चर्चा झाली. संघटनेला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याचे नियोजन करण्यात आले.
अध्यक्ष भानुदास भारंबे यांनी सांगितले शोधक पत्रकारिता करणे आणि निर्भिड पत्रकारिता करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले
या बैठकीला वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीने पत्रकार संघाला अधिक सक्षम करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. येत्या काळात पत्रकारीय आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.





