खान्देशगुन्हेजळगांव

चाळीसगावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव: सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १७ वर्षीय मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १४ मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरात घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शहरात राहणारी १७ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना संशयित इक्बाल शेख याने तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. त्याने मुलीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलीच्या आईने याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button