
पिंप्राळा येथे श्री गोविंद प्रभू महाराज अवतार दिन महोत्सव उत्साहात साजरा होणार
जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा येथील श्री दत्तात्रेय प्रभू मंदिरात उद्या दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराज यांचा अवतार दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पवित्र सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र कनाशी येथील खामणीकर पिढीतील मुख्य वंदन श्री प्रभू बाबा यांचे दाढीचे विशेष वंदन होणार असून, कवीश्वर कुळाचार्य आचार्यप्रवर श्री मोठे बाबाजी (श्री क्षेत्र कनाशी) यांचे भव्य निरूपण होणार आहे. या सोहळ्यास पारीमांडल्य कुळाचार्य आचार्यप्रवर श्री मोठे बाबाजी, जळगाव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान, या सोहळ्यात जळगावच्या लोकप्रिय खासदार श्रीमती स्मिता ताई वाघ, शहराचे आमदार राजू मामा भोळे व सुप्रसिद्ध सिनेतारका कुमारी पूर्वी महाजन यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात देवपूजा, प्रसाद वंदन, आरती, उपहार तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व सद्भक्तांनी या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तात्रेय प्रभू मंदिर संस्थान ट्रस्ट, पिंप्राळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.





