इतर

अवैध गॅस रिफिलिंगच्या व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मागितली १२ हजारांची लाच

दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह खासगी पंटर जाळ्यात ; धुळे ACB ची कारवाई

अवैध गॅस रिफिलिंगच्या व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मागितली १२ हजारांची लाच

दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह खासगी पंटर जाळ्यात ; धुळे ACB ची कारवाई

अमळनेर प्रतिनिधी – अवैध गॅस रिफिलिंगच्या व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी १२ हजारांची आलाच मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचारी आणि एका खासगी पंटरला अटक केल्याची खळबळजनक घटना २४ रोजी घडली असून याप्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका खाजगी व्यक्तीविरोधात १२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. अवैध गॅस रिफिलिंगच्या व्यवसायासाठी लाच मागण्यात आली होती. ही कारवाई २४ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ टपरीमध्ये एलपीजी गॅसवर वाहनांना इंधन भरण्याचा व्यवसाय करतात. पोलीस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील (३६) आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे (३३) यांनी या व्यवसायावरून दरमहा १५,००० लाच मागितली होती. लाच न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली.

याप्रकरणी तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी ACB, धुळे येथे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान लाचखोरांनी तडजोड करत १२,००० स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला.

लाच स्वीकारण्यासाठी पोलिसांनी खाजगी व्यक्ती उमेश भटु बारी (४६) याला मधल्या व्यक्ती म्हणून वापरले. बहादरपुर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मीनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ‘स्वराज्य पान सेंटर’ येथे ही रक्कम स्वीकारताना तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले.

या तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ACB धुळेचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे आणि इतर अधिकारी व कर्मचारी – राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांनी हि कारवाई केली.

सरकारी वा निम-सरकारी अधिकारी, कर्मचारी अथवा खाजगी व्यक्तीने कोणत्याही कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB, धुळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button