खान्देशगुन्हेजळगांव

पाचोऱ्यात महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची धडक कारवाई

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७) यांना एसीबीच्या पथकाने बुधवारी (१० सप्टेंबर) १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या पत्नीची पळसणे शिवारातील जमीन वहिताखाली लावण्यासाठी अर्ज दाखल होता. या प्रक्रियेसाठी लोखंडे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडून आधीच ५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर, उर्वरित १० हजार रुपयांसाठी ते वारंवार तगादा लावत होते. नैसर्गिक आपत्तीची भरपाई आणि शेतीसाठी कर्ज मिळवण्यासाठी ही नोंदणी आवश्यक होती.

तक्रारदाराने अखेर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने सापळा रचून, पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लोखंडे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.या कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, शिपाई भूषण पाटील, राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button