खान्देशजळगांवराजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा

जळगाव (प्रतिनिधी) – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक 12 सप्टेंबर रोजी नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे पार पडली. बैठकीस शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमांची रूपरेषा निश्चित करून कार्यक्रमांसाठी समित्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी आ. सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे आणि उदयजी भालेराव यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक नितीन इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन जयेश भावसार यांनी केले. या प्रसंगी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांचा शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

सेवा पंधरवडा अंतर्गत उपक्रम व संयोजक पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले:

स्वच्छता अभियान – संयोजक राजेंद्र मराठे

‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण – संयोजक भारतीताई सोनवणे

रक्तदान शिबीर – संयोजक महेश पाटील

आरोग्य शिबीर – संयोजक डॉ. मनोज टोके

पंतप्रधानांच्या जीवनपटावर आधारित फिल्म – संयोजक पवन खंबायत

प्रबुद्ध नागरिक संवाद – संयोजक भूषण लाडवंजारी, सह संयोजक सुनील वाणी

दिव्यांग व प्रतिभावान व्यक्ती सन्मान – संयोजक डॉ. चंद्रशेखर पाटील

वोकल फॉर लोकल प्रसार – संयोजक संतोष इंगळे

पंतप्रधानांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप – संयोजक राजेंद्र घुगे पाटील

खासदार क्रीडा चषक – संयोजक अरुण श्रीखंडे, सह संयोजक निलेश बाविस्कर

विकसित भारत चित्रकला स्पर्धा – संयोजक शिरीष तायडे

मोदी विकास मॅरेथॉन – संयोजक महेश पाटील (युवा मोर्चा)

पंतप्रधानांच्या जीवनावर प्रदर्शनी – संयोजक प्रकाश बालाणी

पंडित दीनदयाळ जयंती (25 सप्टेंबर) – संयोजक ॲड. शुचिता हाडा

गांधी जयंती (2 ऑक्टोबर) – संयोजक प्रदिप रोटे

या बैठकीत जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारतीताई सोनवणे, प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button