जळगाव ;- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह दि. 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा यशस्वी करावा असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश माहाजन यांनी केले.
आज भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात दुपारी प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी खासदार उन्मेष पाटील,आ. राजूमामा भोळे ,आ. मंगेश चव्हाण , माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आदी उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि, गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा हा दौरा कार्यकर्त्यांनी उतसाहात यशस्वी करावा ,युवकांसाठी दिनांक १५ रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याला मोठ्या संख्येने जिल्हा वासियांनी उपस्थित राहण्याचे नियोजन पदाधिकाऱ्यांनी करावे ,जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असून श्री. शहा यांना जिल्ह्याची संस्कृती आपल्या उपास्थीतून दाखवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार उन्मेष पाटील,आ. राजूमामा भोळे,आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला भाजपाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी,नगरसेवक, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.