
बिलवाडी येथील तोडफोड प्रकरणी ३७ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
जळगाव: जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयितांच्या घरांवर हल्ला करत तोडफोड केली आणि त्यांच्या घराबाहेरील दुचाकी, कार आणि ट्रॅक्टर जाळून टाकले. या प्रकरणी रतीलाल त्र्यंबक पाटील (वय ६५, रा. बिलवाडी) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३७ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ सप्टेंबर रोजी बिलवाडी येथे जमावाने रतीलाल पाटील आणि संशयितांच्या घरांवर दगडफेक केली. त्यांनी घरात अनधिकृत प्रवेश करून सामान बाहेर फेकले आणि घराबाहेरील वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. या घटनेत रतीलाल पाटील गंभीर जखमी झाले.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे रतीलाल पाटील यांनी १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, चिमनराव रविंद्र गोपाळ, संदीप आप्पा गोपाळ, भाईदास उर्फ भाया गोपाळ, जगदिश कैलास गोपाळ, बबलू मंगल गोपाळ, रोहम कैलास तेले, गोविंदा उत्तम गोपाळ, शिवदास उर्फ बाबा गोपाळ, अजय अनिल गोपाळ, प्रकाश उर्फ पक्या गोपाळ, सुनिल दशरथ गोपाळ, अनिल दशरथ गोपाळ, दिनेश बाबुलाल गोपाळ, राहुल नकूल गोपाळ, राजू रतन गोपाळ, गजानन बागवत गोपाळ यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.





