एरंडोल ;- – इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून कासोद्याच्या वकिलांची सुमारे १० लाख ८० हजारात फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, वासुदेव धोंडू वारे रा. कासोदा हे व्यवसायाने वकील आणि शेती करतात . त्यांनी संजय दिनकर जिवरक आणि महेश संजय जिवरक रा. शिरसगाव ता. निफाड यांच्या मालकीची जीआयव्हीएस एक्स्पोर्ट अँड इम्पोर्ट प्रा. लि . ओझर सैय्यद फाटा नाशिक येथील कंपनीतून वासुदेव वारे यांनी कासोदा येथे शोरूम टाकण्याकरिता व डिलरशिप मिळण्यासाठी ६ नोव्हेंबर २०१८ ते आज पावेतो पर्यंत १० लाख ८० हजार संजय दिनकर जिवरक आणि महेश संजय जिवरक यांनी घेऊन गाड्या अथवा डिलरशिप न देता फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केल्यावरून दोघांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि योगिता नारखेडे करीत आहे.