खान्देशगुन्हेजळगांव

वाहनात घरगुती गॅस चा काळाबाजार ; पाच जणांना अटक

१२८ गॅस सिलेंडरसह दोन वाहने जप्त

जळगाव;- शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून १२८ गॅस सिलेंडर आणि दोन मालवाहू वाहने असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, समता नगर येथील पठाण बाबा दर्गाजवळ चुनाभट्टी येथील पत्र्याच्या शेडमध्ये संशयित गौतम सोनवणे, गोपाल घुगे दत्तू मैराळे, राहुल साळुंखे आणि जागा मालक विजय सोनार हे 9 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अवैधरीत्या वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरतांना आढळून आले. एचपी ,बीपी गॅस कंपन्यांचे 128 सिलेंडर , अतुल कंपनीचे मालवाहू वाहन क्रमांक एम एच 19- सी डब्ल्यू 42 78 आणि चार लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो कंपनीचे वाहन क्रमांक एक mh19 बी एम 50 34 ताब्यात घेण्यात आले असून पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून जिलपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल तपास करीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button