नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूलच्या खोट्या जाहिरातीबाबत संस्थेची जाहीर सूचना

नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूलच्या खोट्या जाहिरातीबाबत संस्थेची जाहीर सूचना
नशिराबाद, ता. जि. जळगाव प्रतिनिधी I
अंजुमन फरोग-ए-तालीम, नशिराबाद संचलित के.एस.टी. उर्दू हायस्कूल, नशिराबाद येथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीसंदर्भात दैनिक लोकमत वृत्तपत्रात दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित झालेली जाहिरात खोटी आणि चुकीची असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
सदर जाहिरात शकील अहेमद शेख मुसा कुरेशी यांनी प्रसिद्ध केली असून, ते शालेय समितीचे अध्यक्ष नसून संस्थेने त्यांना बरखास्त केले आहे. तसेच, ते संस्थेचे सभासदही नाहीत, असे संस्थेने जाहीर केले आहे.
या जाहिरातीचा अंजुमन फरोग-ए-तालीम संस्था आणि के.एस.टी. उर्दू हायस्कूलशी कोणताही संबंध नाही. यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, जळगाव यांनी दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी पत्र क्रमांक शिक्षण/माध्य/एस-२/१७१२९३६ द्वारे सदर जाहिरातीला स्थगिती दिली आहे.
संस्थेचे अध्यक्ष काझी अबरार अहेमद, उपाध्यक्ष शेख असलम तनवीर आणि सचिव सै. अकील रज्जाक यांनी संयुक्त निवेदनात सर्वांना आवाहन केले आहे की, कोणीही या खोट्या जाहिरातीला बळी पडू नये. तसेच, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मुलाखतींसाठी कोणीही उपस्थित राहू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
या प्रकरणी संस्थेने स्पष्ट केले आहे की, कोणतीही भरती प्रक्रिया सुरू असल्यास त्याबाबत अधिकृत आणि वैध जाहिरात संस्थेद्वारेच प्रसिद्ध केली जाईल. सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.





