जळगाव (प्रतिनिधी ) ;- इकरा एज्युकेशन सोसायटीच्या इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मेहरूण, जळगाव येथे गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त इकरा शाहीन उर्दू हायस्कूल, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी गणिताची विविध मॉडेल्स तयार केले होते, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या मॉडेल्सची माहिती दिली.
इकरा शाहीनचे अतिक शेख सर यांनी गणित दिनाचे महत्त्व सांगताना गणिताशी संबंधित अनेक मूलभूत गोष्टी मुलांना समजावून सांगितल्या व मुलांना गणित विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
साबीर सर, कौसर सर, मोहसीन शेख , फरहान शेख यांनी मुलांनी मॉडेल्स बनवण्यासाठी माहिती दिली. इकरा शाहीनच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी इकरा आयटीआयचे प्राचार्य जुबेर मलिक साहब आणि प्राचार्य काझी जमीरुद्दीन सर यांच्या हस्ते मुलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह, सचिव एजाज मलिक, शाळेचे चेअरमन डॉ. ताहीर शेख, इकरा शाहीन उर्दू हायस्कूलचे प्राचार्य काझी जमीरुद्दीन यांनी अभिनंदन केले. गणित दिनानिमित्त झाकीर बशीर , बरकत यांनी अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावेद सर, मंजूर सर, इमरान खान सर , मेहरुंनिस्सा खान मिस, नूरजहाँ मिस व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा चोख पार पाडली.