
दहिवद गावात दाम्पत्याला बेदम मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
अमळनेर : तालुक्यातील दहिवद गावात दाम्पत्याला काहीही कारण नसताना विट आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची तसेच जीवेठार मारण्याची घटना २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिवद गावातील हिराबाई प्रकाश पाटील (वय ५०) या आपल्या पती प्रकाश पाटील यांच्यासह घरी नातेवाईकांसोबत ओट्यावर बसून गप्पा मारत होत्या. त्याचवेळी समोर राहणारे हरीदास गुलाब पाटील, स्विटी गुलाब पाटील व गुलाब आत्माराम पाटील या तिघांनी कोणतेही कारण नसताना त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी विट व लाकडी काठ्यांनी दोघांना मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पीडितांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी हरीदास पाटील, स्विटी पाटील व गुलाब पाटील या तिघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील करीत आहेत.





