
खान्देश टाइम्स न्यूज l जळगांव l १० डिसेंबर २०२५ l रोजी इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मेहरुण जळगाव येथील इयत्ता नववीच्या वीस विद्यार्थिनींनी मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम सावखेडे शिवार, जळगाव) येथे भेट देऊन तेथील वृद्धांची कशा प्रकारे काळजी घेतली जाते? त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था कशी आहे? त्यांची दिनचर्या काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील मतिमंद मुलांसाठी असलेल्या विभागालाही भेट दिली व त्यांची दिनचर्या जाणून घेतली.
याप्रसंगी 53 वृद्ध व 36 मतिमंद यांना बिस्किट, सफरचंद व केळी देण्यात आली.
यावेळी त्यांची परिस्थिती बघून मुलींचे डोळे भरून आले होते. त्यांना घरातील वृद्धांची काळजी घेण्याची शिकवण याद्वारे मिळाली. तसेच जीवनात चांगले कार्य करण्याचा संदेशही त्यांना मिळाला.
सदरील भेटीचे नियोजन व कार्यक्रमाची रूपरेषा शेख रोशन व तंजीम आरा यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख जाकीर बशीर यांनी प्रयत्न केले. तर शाळेचे प्राचार्य काझी जमीरुद्दीन यांनी मार्गदर्शन केले.





