
व्ही. पी. होले. शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा
जळगाव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटीचे व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.रंजना सोनवणे यांनी उपस्थित सर्व प्राध्यापीका व विद्यार्थीनी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे समन्वयन डॉ.संभाजी जमधडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.सुनीता नेमाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना महिला सन्मान व महिलांच्या प्रापंचिक जबाबदार्या याविषयी मत मांडतांना महिलांचा आदर नेहमीच केला पाहिजे तसेच खरे पाहता आजही स्त्रियांना समान अधिकार प्राप्त झालेले नाहीत असे मत मांडले.तर अध्यक्षिय भाषणात डॉ. रंजना सोनवणे यांनी स्त्रियांच्या व्यथा आणि कथा याविषयावर आपले मत मांडले.या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.




