भुसावळ : शहरातील हंबर्डिकर चाळ परिसरामधून एका वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सुमारे ५ लाख ५७ हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता समोर आली होती. याप्रकरणी २६ नोव्हेंबरला भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भुसावळ शहरातील हंबर्डिकर चाळ परिसरामध्ये अरुण दोदू चौधरी (वय ६८) हे वृद्ध आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत आहेत. दरम्यान, ८ ते ९ नोव्हेंबरदरम्यान त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. यानंतर चौधरी यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे
व चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची ही घटना ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लक्षात आली होती. त्यानंतर त्यांनी चोरी झाल्याबाबत माहिती घेतली.
परंतु, त्यांना या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर अरुण चौधरी यांनी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत.