खान्देशगुन्हेजळगांव

गावठी पिस्तूल घेऊन दहशतमजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

गावठी पिस्तूल घेऊन दहशतमजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

नशिराबाद पोलिसांची कारवाई

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथे बसस्थानक परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई १९ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली असून आरोपीकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, नशिराबाद गावातील बसस्थानक परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची अळी, नशिराबाद) हा गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.

सापळा रचून आरोपी ताब्यात

पोलीस पथकाने सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक धाड टाकत आरोपीला जागीच पकडले. त्याच्या ताब्यातून लोखंडी बनावटीचा, चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिकच्या मुठीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली. पथकात पोउनि हरेष पाटील, चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार व समीर सैय्यद यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button