इतरखान्देशगुन्हेजळगांव

राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये जळगाव पोलीस दलाची दमदार कामगिरी

राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये जळगाव पोलीस दलाची दमदार कामगिरी

तीन सुवर्ण, दोन कांस्य पदकांसह ‘उत्कृष्ट टीम’चा किताब; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सत्कार

जळगाव : महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (टीओटी) प्रशिक्षणामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत तीन सुवर्ण पदके, दोन कांस्य पदके तसेच उत्कृष्ट टीमचा किताब पटकावला आहे. या यशामुळे जळगाव पोलीस दलाचा राज्यस्तरावर नावलौकिक वाढला असून पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून राज्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. वाढत्या गुन्हेगारी, दहशतवाद, नक्षलवाद, गँगवार तसेच गावठी कट्ट्यांच्या घटनांना प्रभावीपणे तोंड देता यावे, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्र हाताळणी, सुरक्षा, अचूक फायरींग आणि नागरिकांचे संरक्षण याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

हे प्रशिक्षण State Reserve Police Force Group No. 1 येथे आयोजित करण्यात आले होते. दिनांक ४ मे ते ९ मे २०२६ दरम्यान झालेल्या सत्रात जळगाव पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. या पथकाला श्रीकांत धिवरे आणि संदीप गावीत यांचे मार्गदर्शन लाभले.

जळगाव पोलीस दलाकडून राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर सैय्यद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपानदेव पाटील, पोहेकॉ रज्जाक सैय्यद, पोहकॉ संतोष सुरवाडे, महिला पोहेकॉ मेघना जोशी, पोना किरण सपकाळे, पोकॉ संदीप पाटील, पोकॉ समीर पठाण आणि महिला पोकॉ प्रियंका टेकारे यांनी सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणामध्ये राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे यांनी शिकवणी प्रकारात ८३ गुण मिळवत सुवर्ण पदक पटकावले. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अली सैय्यद यांनी आंतरवर्गीय फायरींगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळवले. तसेच पोलीस अंमलदार समीर पठाण यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सुवर्ण पदक पटकावले. जळगाव पोलीस दलाच्या संपूर्ण संघाने एकत्रित कामगिरीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकासह उत्कृष्ट टीमचा किताब जिंकला.

या यशस्वी कामगिरीबद्दल सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता श्रीकांत धिवरे यांच्या दालनात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी संदीप गावीत, प्रदीप ठाकूर तसेच प्रशांत सुगरवार उपस्थित होते. सर्व विजेत्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button