मुक्ताईनगर ;- मुक्ताईनगर मतदारसंघातील घोडसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत 2 कोटी 75 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे तसेच विविध विकास कामांचे भूमिपुजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.व मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे करणे हेच ध्येय ठेऊन माझं कर्तव्य बजावत असल्याने आपल्या सर्वांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले असून या गोष्टीचा आनंद व समाधान आहे. तसेच
याठिकाणी घोडसगाव वासीयांनी एवढ्या मोठ्या संख्येने दिलेले प्रेम कदापि विसरू शकणार नाही. तुमच्या गावातील जास्तीत जास्त अडचणी सोडवण्यास नेहमीच तत्पर असून मला तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे व आशीर्वादामुळे जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहे, हेच वचन यानिमित्ताने देतो.असे मत आ.पाटील यांनी भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, अल्पसंख्याक संघटक अफसर खान, आरिफ आझाद, उपविभाग प्रमुख गोलू मुर्हे, सरपंच प्रतिभा प्रदीप कोल्हे , ग्रा.पं. सदस्य अर्जुन सांगळकर, प्रफुल्ल जवरे, सोनाली पटेल, बबिता कपले, प्रभाकर धायडे, भिकाजी कोल्हे, डॉ. सोपान दुट्टे, व्ही.आर. पाटील, निखिल कपले, अशोक पटेल, अनिल पटेल, बळीराम सावळे, पुंडलिक पाटील व गावातील जेष्ठ नागरिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच गावाकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती.