
सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे एसआयआर कॅम्पचे यशस्वी आयोजन
जळगाव, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सर्वेक्षण पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन, जळगावतर्फे रविवारी (दि. ५) विशेष कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कॅम्प आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये जळगाव शहरातील भिलपुरा, इस्लामपुरा आणि बागवान मोहल्ला परिसरातील यादी भाग क्रमांक ११२, ११३, ११४, ११५, ११६ व ११७ मधील मतदारांचे मॅपिंग करून एसआयआर फॉर्म भरण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
कॅम्पदरम्यान बीएलओंना सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या सदस्यांनी संपूर्ण सहकार्य केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना एसआयआर कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
“मतदान हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क असून तो अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने योग्य पद्धतीने मॅपिंग करून अचूक फॉर्म भरावा. तसेच कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांना या प्रक्रियेची माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन करावे. ही एक प्रकारची देशसेवा आणि समाजसेवा आहे. विशेषतः युवकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी सै. अयाज अली नियाज अली, नाझीम कुरैशी, शफी ठेकेदार, सलमान मेहबूब, शेख नजिरुद्दीन, अझीम खाटीक, हाजी सलीमुद्दीन, हाजी शकूर बादशाह, अकबर इब्राहिम, मौलाना रफीक रजवी आणि शेख शाहरुख यांनी विशेष परिश्रम घेतले.




