खान्देशजळगांवसामाजिक

सामाजिक कार्याची दखल; शितल सोनवणे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

सामाजिक कार्याची दखल; शितल सोनवणे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

महिला बचाव सेवा संस्थेकडून दुहेरी जबाबदारी; राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव | प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, कार्यस्थळी होणारा छळ, संकटग्रस्त महिलांना तातडीची मदत, कायदेशीर सल्ला व संरक्षण तसेच महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि घटस्फोटित महिलांना कायदेशीर, आर्थिक व भावनिक मार्गदर्शन अशा विविध सामाजिक क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेल्या जळगावातील द्वारका नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या शितल काशिनाथ सोनवणे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

महिला बचाव सेवा संस्था (कार्यक्षेत्र – संपूर्ण भारत) यांच्या वतीने शितल सोनवणे यांची ‘महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष’ तसेच ‘मानवसेवा अधिकार – महाराष्ट्र राज्य पत्रकार’ या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत असून, महाराष्ट्रभरातील विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महिलांच्या न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार शितल सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button