
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये ‘नशामुक्त युवा’ शपथ ग्रहण
जळगाव : भारत सरकारच्या MY Bharat प्लॅटफॉर्मअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त युवा अभियान’ अंतर्गत मेहरूण येथील इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
यावेळी फरहान शेख सर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच नशेच्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करण्याचा तसेच निरोगी व नशामुक्त भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला.
शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांवर भर
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नशेचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि इतर सकारात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला बरकत सर, जावेद सर, मेहरुन्निसा मिस, कौसर सर, नूरजहां मिस, रिफत मिस यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्यास तसेच समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी प्रेरित केले.
‘नशेला नाही, निरोगी जीवनाला होकार’
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘नशेला म्हणू नका, निरोगी जीवनाला हो म्हणा’ हा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल इकरा शाहीनचे प्राचार्य रियाज शाह सर, पर्यवेक्षक जाकिर शेख सर, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम साहेब आणि सचिव एजाज अहमद मलिक साहेब यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.





