खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेत भूषण हंसकर यांचा दुहेरी बहुमान

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेत भूषण हंसकर यांचा दुहेरी बहुमान

‘गुन्हे विषयक छायाचित्र’ आणि ‘जळगाव वारसा’ या दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक; पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘विश्वासाची लेन्स’ या छायाचित्र स्पर्धेत भूषण हंसकर यांनी उल्लेखनीय यश संपादन करत दुहेरी बहुमान मिळविला. हंसकर यांनी ‘गुन्हे विषयक छायाचित्र’ तसेच ‘जळगाव वारसा’ या दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या छायाचित्रण कौशल्याची प्रभावी छाप उमटविली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच नाशिकचे पालकमंत्री आणि जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूषण हंसकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास, संवाद व समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाने ‘विश्वासाची लेन्स’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विविध विषयांवरील छायाचित्रे सादर करण्यात आली. हंसकर यांनी टिपलेल्या गुन्हे विषयक तसेच जळगावच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेत दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक मिळविला.

या सत्कार समारंभास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी भूषण हंसकर यांच्या दुहेरी यशाचे कौतुक करून फोटोग्राफी क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जळगावचा समृद्ध वारसा आणि गुन्हे विषयक वास्तव आपल्या कॅमेऱ्यातून प्रभावीपणे टिपून ते समाजासमोर मांडल्याबद्दल हंसकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button