खान्देशजळगांवधार्मिकसामाजिक

श्री गणेशोत्सवानिमित्त खान्देश टाइम्स न्यूजतर्फे विशेष ऑनलाइन स्पर्धा

जळगावकरांना कला, संस्कृती, सर्जनशीलता आणि सामाजिक संदेश मांडण्याची संधी; आकर्षक बक्षिसांनी विजेत्यांचा गौरव

श्री गणेशोत्सवानिमित्त खान्देश टाइम्स न्यूजतर्फे विशेष ऑनलाइन स्पर्धा

जळगावकरांना कला, संस्कृती, सर्जनशीलता आणि सामाजिक संदेश मांडण्याची संधी; आकर्षक बक्षिसांनी विजेत्यांचा गौरव

जळगाव : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कला, संस्कृती, सर्जनशीलता, कुटुंब, पर्यावरण आणि सामाजिक जनजागृतीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खान्देश टाइम्स न्यूज या लोकप्रिय YouTube न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रथमच जळगावकरांसाठी ‘श्री गणेशोत्सव विशेष स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

या ऑनलाइन स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना आपली कला, कल्पना आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे. विविध स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकृती, व्हिडिओ तसेच सामाजिक संदेशांची निवड करून विजेत्यांचा आकर्षक बक्षिसांनी गौरव करण्यात येणार आहे.

आजची विशेष स्पर्धा ‘एका मिनिटात गणेश मंडळाचे रिपोर्टिंग’ या विषयावर आधारित आहे. सहभागी स्पर्धकांनी आपल्या शहरातील किंवा परिसरातील प्रसिद्ध गणेश मंडळाला भेट देऊन तेथील सजावट, गणेशमूर्ती, धार्मिक वातावरण, सामाजिक उपक्रम तसेच वैशिष्ट्यपूर्ण बाबींचे सुमारे एक मिनिटाचे व्हिडिओ रिपोर्टिंग स्वतः रेकॉर्ड करायचे आहे.

या स्पर्धेत सहभागी होताना स्पर्धकांनी एखाद्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीप्रमाणे मंडळाची माहिती आणि तेथील वातावरण प्रभावीपणे व्हिडिओच्या माध्यमातून सादर करावे. व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण आणि सकारात्मक संदेशाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव केवळ उत्सव म्हणून न साजरा करता कला, संस्कृती आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपला फोटो किंवा व्हिडिओ पाठवावा.

संपर्क : ९०२८१३१५४५

खान्देश टाइम्स न्यूज लोकप्रिय YouTube न्यूज चॅनेल

संपादक : जकी अहमद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button