खान्देशजळगांवसामाजिक

इस्लामपुरा व झोपडपट्टी भागाची मोजणी तातडीने सुरू करा; अन्यथा नगर परिषदेत भव्य मोर्चा काढणार – MPJ चा मुख्याधिकाऱ्यांना इशारा!

इस्लामपुरा व झोपडपट्टी भागाची मोजणी तातडीने सुरू करा; अन्यथा नगर परिषदेत भव्य मोर्चा काढणार – MPJ चा मुख्याधिकाऱ्यांना इशारा!

फैजपूर प्रतिनिधी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत दिनांक 01/01/2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया शासन निर्णयानुसार डिसेंबर 2026 अखेर पूर्ण करण्याचे निर्देश असताना, फैजपूर शहरातील इस्लामपुरा व झोपडपट्टी भागातील प्रत्यक्ष मोजणी अद्याप सुरू झालेली नाही. या दिरंगाईच्या निषेधार्थ आज मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (MPJ), फैजपूरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

सप्टेंबर महिन्यापासून अतिक्रमण नियमितीकरणासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. शहरातील काही भागांमध्ये सर्वेक्षणानंतर मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, इस्लामपुरा व झोपडपट्टी भागातील मोजणी अद्याप सुरू न झाल्याने या भागातील पात्र नागरिकांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी MPJ च्या वतीने इस्लामपुरा व झोपडपट्टी भागातील प्रलंबित मोजणीचे काम तातडीने सुरू करून नोव्हेंबर 2026 अखेर पूर्ण करावे, तसेच शासन निर्णयानुसार डिसेंबर 2026 अखेर नियमितीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

काही दिवसांत मोजणी सुरू न झाल्यास नगर परिषद कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही MPJ च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना दिला.

या निवेदनप्रसंगी MPJ फैजपूर शहराध्यक्ष रहीमुद्दीन, उपाध्यक्ष बी. डी. महाले सर, जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद, जिल्हा सदस्य आर. बी. चौधरी, स्थानिक MPJ सदस्य शेख निजामुद्दीन, साईम कुरेशी, ॲड. शरद तायडे, शेख लुकमान मिस्त्री, इकबाल खान, मोहम्मद इलियास, शेख जावेद, सुनील लासुरे, फिरोज पटेल, रफीक कुरेशी यांच्यासह MPJ चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काच्या निवासस्थानाबाबत न्याय मिळावा आणि शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी MPJ सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button