इतर
महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून नवीन चारचाकी वाहने
जळगाव, जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्हा महसूल प्रशासनाला आज चार नवीन वाहने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आल्या. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण ,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या मध्यमातून प्रत्येकी ८ लाख रूपये किंमत असलेले चार नवीन महेंद्रा बोलेरा वाहने खरेदी करण्यात आली होती. जळगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार एरंडोल, चाळीसगाव व रावेर यांना महसूली कार्यालयांना वाहने हस्तांतरित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, तहसीलदार विजय बनसोडे, संबंधित प्रांतधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.