उ.बा.ठा.चे वक्ते व माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश

उ.बा.ठा.चे वक्ते व माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश
भडगांव – प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उ.बा.ठा. चे वक्ते गणेश परदेशी यांनी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला बसून आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
‘उबाठा’ गटाचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांनी ठाकरे गटाला रामराम करत आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा मुबंईत पार पडला. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, माजी नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, देवा अहीरे, जगन भोई, बापूराव पाटील, महेद्र ततार, रविंद्र पाटील, प्रदिप मालचे आदि उपस्थित होते. गणेश परदेशी यांच्या प्रवेशामुळे ‘उबाठा’ चे शहरात मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.