‘होंडा एलेव्हेट’चे उद्या दिमाखात होणार लॉन्चिंग
‘होंडा एलेव्हेट’चे उद्या दिमाखात होणार लॉन्चिंग
जळगाव, दि.२२ – चारचाकी निर्मितीत अग्रेसर असलेल्या होंडाच्या श्रेणीत आणखी एक चारचाकी जुळली आहे. होंडाची नवीन आवृत्ती एलेव्हेटचे उद्या जळगावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. आदित्य कार्स प्रा.लि.तर्फे आयोजित सोहळा उद्या दि.२३ रोजी सायंकाळी ५ वाजता अजंता स्क्वेअर येथे होणार आहे.
होंडा कंपनीची प्रसिद्ध कार ‘होंडा एलेव्हेट’ नुकतेच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली होती. ‘होंडा एलेव्हेट’ आता जळगावात आदित्य होंडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. कारचा लॉन्चिंग सोहळा उद्या दि.२३ रोजी अजंता स्क्वेअर, अजिंठा रोड याठिकाणी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ‘होंडा एलेव्हेट’चे लॉन्चिंग केले जाणार असून समस्त जळगावकर आणि होंडाप्रेमींनी आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन आदित्य होंडातर्फे करण्यात आले आहे. Honda Elevate ची थेट स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Suzuki Grand Vitara यांच्याशी होऊ शकते.
ही आहेत वैशिष्ट्ये :
Honda Elevate SUV परदेशात विकल्या जाणार्या HR-V आणि CR-V मॉडेल्स सारखी दिसणार आहे. यात बुच अपील असेल आणि त्याची लांबी सुमारे 4.2-4.3 मीटर असेल. एलिव्हेटमध्ये लेव्हल-2 ADAS (एडवांस्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम), कनेक्टेड कार कार्यक्षमतेसह 10.25 टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरुफ इ. मिळेल. सोबत एलईडी लाईट्स असतील. चाकांच्या वरील डिझाईन चौकोनी असणार आहे. ही कार 1.5L पेट्रोल इंजिनसह ऑफर केली आहे. ट्रान्समिशनसाठी, ती 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक CVT पर्याय आणि पॅडल शिफ्टर्सशी जोडलेली आहे.