शासकीयशिक्षण

शिक्षकांनी समाज शिक्षक व्हावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी तंत्रस्नेही होण्याची गरज – जिल्हाधिकारी

जळगाव l ५ सप्टेंबर २०२३ l विद्यार्थी पटसंख्या हा शाळेचा आत्मा आहे. पटसंख्येवर मराठी शाळेचे वैभव टिकूनअसल्याने पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावे इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत मराठी शाळांची पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांनी समाज शिक्षक होण्याची गरज आहे. तसेच १६ कलमी शैक्षणिक उपक्रमात ६० टक्के नव्हे तर १०० टक्के गुणवत्ता वाढविण्यासाठी शपथ घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर शिक्षकांनी तंत्रस्नेही होण्याची गरज असल्याची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली.

मंगळवारी ला.ना.शाळेच्या गंधे सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ शिक्षकांना जळगाव जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी आर. डी. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माजी शिक्षणाधिकारी तथा डाएटचे प्राचार्य नीळकंठ गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. गुरुजंनांचा आदर करणे ही परंपरा आहे. ज्या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली. त्यांचा गौरव झालाच पाहिजे. ज्या प्रमाणे जग बदलतेय. त्याचप्रमाणे शिक्षक बदलतोय आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. बाला प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यात २७८ शाळांना वॉलकंपाऊड बांधण्यात येऊन शाळांची प्रॉपर्टी सुरक्षित केली आहे. तसेच जिल्हाधिकारी-सीईओ आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयातून आणि एकमेकांच्या सहकार्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, माजी डाएटचे प्राचार्य नीळकंठ गायकवाड यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त रावेरचे शिक्षक जितेंद्र गवळी, वराड बु.ता.धरणगावचे शिक्षक विजय बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी पुरस्काराचे महत्त्व विषद करून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. केले. सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती राणे व शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षाणाधिकारी सचिन परदेशी यांनी मानले.

शिक्षकांनी तंत्रस्नेही होण्याची गरज – जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद

तत्कालीन सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्या बदलीनंतर रिक्त जागा भरण्याचे काम श्री.अंकित यांनी सुरु केले आहे. शालेय मुलीचे पालकांना पत्र हा उपक्रम अभिनव असून शैक्षणिक गुणवता धोरण वाढीसाठी वाडी-वस्त्यांपर्यंत शिक्षकांनी पोहोचले पाहिजे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २१ कोटी रुपये मंजूर करुन जिल्ह्यात बाला प्रकल्पासाठी शाळांना संरक्षण भिंती बांधून मुलांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित केले. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. निपून भारत उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला शिक्षकांनी प्लॅन तयार करुन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे. तसेच आता काळानुरुप शिक्षकांनी देखील तंत्रस्नेही शिक्षक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निपुण भारत उपक्रमाची अंमलबजावणी करून जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहता कामा नयेतसेच विविध उपक्रम राबव राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. तर माजी शिक्षणाधिकारी तथा डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड आप्पा यांनी सांगितले की, पुरस्कार व पारितोषिक हे ओझं आहे ते पेलण्यासाठी शिक्षकांनी सज्ज असले पाहिजे. विद्यार्थ्यांचे उत्तरदायित्व स्वीकारण्याचे आवाहन केले.

या शिक्षकांचा झाला सन्मान

जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक गजाजन रमण चौधरी (ढेकुसूम, ता. अमळनेर), गणेश व्यंकटराव पाटील (अंचळगाव, ता. भडगाव), महेंद्रसिग शिवशिंग पाटील (नांदगाव, ता. भडगाव), रिजवानखान अजमलखां (उर्दू शाळा कुर्हे पानाचे, भुसावळ), किशोर बाळाराम पाटील (देवगाव, ता. चोपडा), शुभांगी एकनाथराव सोनवणे (न्हावे, ता. चाळीसगाव), विजय काशिनाथ बागुल (वराड, ता. धरणगाव), गणेश सुखदेव महाजन (टाकरखेडा, ता. एरंडोल), ज्योती सतीश तडाखे (नांद्रे, ता. जळगाव), कैलास समाधान पाटील (सोनारी, ता. जामनेर), धनलाल वसंत भोई (केंद्राचे शाळा ना. १ मुक्ताईनगर), विजया भालचंद्र पाटील (बाळंद, ता. पाचोरा), अलका बाबुलाल चौधरी (बोळे, ता. पारोळा), जितेंद्र रमेश गवळी (पुनखेडा, ता. रावेर), अतुल रमेश चौधरी (सांगवी, ता. यावल). आदी शिक्षकांना पुरसकार देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button